Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu
जि.प.केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी कन्या शाळा विडूळ तर्फे आपले ब्लॉगवर हार्दिक स्वागत! ब्लॉगचे काम चालू आहे भेटीबद्दल धन्यवाद !

Saturday 1 April 2017

*सरल महत्वाचे* :
*सूचना क्रमांक* : *१०२२*
*दिनांक* : *०१/०४/२०१७*
*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*
*प्रदीप भोसले,हवेली,पुणे*

(सदर पोस्ट ही *मा.डॉ.सुनिल मगर साहेब,अध्यक्ष,ई-गव्हर्नन्स,महाराष्ट्र राज्य तथा संचालक,बालभारती* यांच्या सूचनेनुसार व निरीक्षणात पाठवलेली आहे)
__________________________________________

 *Duplicate विद्यार्थी सिस्टिम मधून काढण्यासाठीची नविण सुविधा उपलब्ध करून दिल्याबाबतची सूचना*  __________________________________________

✏आपल्या शाळेत डुप्लिकेट विद्यार्थी आहे किंवा नाही,असल्यास त्या डुप्लिकेट विद्यार्थ्याच्या बाबतीत नवीन पद्धतीने प्रोसेस कशी करावी हे जाणून घेण्यासाठी आमच्या
 pradeepbhosale.blogspot.in
या ब्लॉग वेबसाईट ला भेट द्या.या ब्लॉग वेबसाईट मधील Student portal या टॅब मधील Duplicate या Tab ला क्लीक करा व संपूर्ण माहिती जाणून घ्या.

                            *किंवा*

✏खालील लिंक ला क्लीक करून मॅन्युअल Download करून सविस्तर माहिती जाणून घ्या.
                            *लिंक*

                  goo.gl/B0CA0L

डुप्लिकेट विद्यार्थी सिस्टिम मधून काढून टाकण्याची नविन प्रोसेस काय आहे हे थोडक्यात पाहू.......

🔸 *डुप्लिकेट विद्यार्थी म्हणजे काय ?*🔸

➡ *एखाद्या शाळेतील विद्यार्थी कोणत्याही कारणात्सव जर त्याच शाळेत अथवा इतर दुसऱ्या कोणत्याही एका अथवा अनेक शाळेत दुबार नोंदवला गेला असेल तर student पोर्टल मध्ये अशा दुबार नोंदवलेल्या गेलेल्या मुलाची एका पेक्षा अधिक नोंद तयार होते.अशा अयोग्य दुबार नोंदीस आपण दुबार म्हणजेच Duplicate विद्यार्थी नोंद असे म्हणतात.म्हणजेच अशा विद्यार्थ्यास Duplicate विद्यार्थी असे संबोधले जाते.* तर अशा अयोग्य नोंदीस आपणास system मधून काढून टाकण्याच्या प्रक्रियेस Duplicate विद्यार्थी system मधून काढून टाकणे असे म्हणावे. असे Duplicate विद्यार्थी आपणास शाळा, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, उपसंचालक, संचालक Login मधून काढण्याची सुविधा student पोर्टल मध्ये नव्याने देण्यात आलेली आहे.

🔸 *डुप्लिकेट विद्यार्थी नोंद कशी तयार होते?*🔸

✏ *१) एखादा विद्यार्थी जुन्या शाळेतुन नवीन शाळेत शिक्षणासाठी ट्रान्सफर झालेला असेल परंतु नवीन शाळेने सदर विद्यार्थी online ट्रान्सफर करून न घेता new entry द्वारे नोंद करून घेतला असेल तर अशा विद्यार्थ्याची दुबार नोंद तयार होते.*

✏ *२) एकाच शाळेत एखाद्या विद्यार्थ्याची चुकून दोन वेळा  नोंद झालेली असेल तर अशी नोंद दोन वेळा तयार होते.*
 
 अशा प्रकारे वरील व इतर काही कारणामुळे विद्यार्थी नोंद ही डुप्लिकेट तयार होते.

 ➡  या आधी देखील असे डुप्लिकेट विद्यार्थी सिस्टिम मधून काढून टाकण्याची सुविधा *शाळा व गटशिक्षणाधिकारी* लॉगिन ला देण्यात आलेली होती.त्यामुळे एकाच शाळेत व  तालुक्यात असे डुप्लिकेट विद्यार्थी काढता येत होते.परंतु एक विद्यार्थी जर इतर तालुक्यात, जिल्ह्यात,विभागात दुबार नोंदवला गेलेला असेल तर अशा विद्यार्थ्यास आधीच्या सुविधेद्वारे सिस्टिम मधून काढता येत नव्हते.परंतू आता दिलेल्या *नवीन सुविधेद्वारे इतर तालुक्यातील,जिल्ह्यातील,विभागातील एकाच विद्यार्थ्याची दुबार झालेली नोंद काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.एवढेच नव्हे तर या सुविधेचा पुन्हा एकाच शाळेतील,तालुक्यातील डुप्लिकेट नोंद असलेल्या विद्यार्थ्याची नोंद देखील नव्याने काढून टाकता येणार आहे.*

➡   या आधी डुप्लिकेट विद्यार्थी काढण्याची जी सुविधा देण्यात आलेली होती ती पद्धत बंद करून *नव्या पद्धतीने डुप्लिकेट विद्यार्थी system मधून काढण्याची सुविधा देण्यात आलेली आहे,ही सुविधा कशा पद्धतीने काम करणार आहे हे सर्वांनी समजून घेणे आवश्यक आहे.*

➡  डुप्लिकेट विद्यार्थी नोंद सिस्टिम मधून काढून टाकण्याच्या या सुविधेमध्ये *सर्वप्रथम प्रत्येक विभागाचे उपसंचालक हे त्यांच्या लॉगिन मधून अशा डुप्लिकेट विद्यार्थ्याची यादी जनरेट करणार आहेत.*ही यादी जनरेट करण्याची सुविधा त्यांच्या लॉगिन ला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

➡ ही *यादी जनरेट केल्यावर जे विद्यार्थी ज्या ज्या शाळेत एका पेक्षा अधिक वेळा नोंद झालेले आहे अशा सर्व शाळेत (जुन्या व नवीन शाळेत) Duplicate या Tab ला क्लीक केल्यावर दिसून येतील.*

➡  *त्यामुळे आपल्या शाळेतील कोणताही विद्यार्थी आपल्या शाळेत, तालुक्यात, जिल्ह्यात, विभागात अथवा राज्यात इतर ठिकाणी डुप्लिकेट झालेला आहें का हे प्रत्येक शाळेने नव्याने तपासून घेणे गरजेचे आहे हे प्रत्येक शाळेने लक्षात घ्यावे.*

➡ जर आपल्या शाळेत शिकत असलेला/नसलेला *एखादा विद्यार्थी डुप्लिकेट या टॅब मध्ये डुप्लिकेट म्हणून दिसत असेल तर अशा विद्यार्थ्यास मार्क करून तो विद्यार्थी आपल्या शाळेत शिकत आहे अथवा नाही ही माहिती भरून वरिष्ठ लॉगिन ला पाठवावी.*ही प्रोसेस कशी करावी हे समजून घेण्यासाठी या पोस्ट मध्ये शेवटी दिलेल्या लिंक ला क्लीक करून सदर प्रोसेस जाणून घ्यावी.

➡ जर *आपल्या शाळेत शिकत असलेला एखादा विद्यार्थी  डुप्लिकेट झालेला दिसून येत असेल तर आपण तशी माहिती online पद्धतीने वरिष्ठ लॉगिन ला कळवावी.जर आपला विद्यार्थी आपल्याच शाळेत अथवा तालुक्यातील इतर शाळेत शिकत असेल तर त्या विद्यार्थाची नोंद आपल्याच शाळेत ठेवण्यासाठीची आपली request आपल्याच तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी यांना जाईल.*तेंव्हा आपण अशा वेळी संबंधित विद्यार्थ्याच्या बाबतीतील पुरावे घेऊन आपल्या गटशिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा व आपली request त्यांच्याकडून approve करून घ्यावी.

✏ वरील प्रमाणे जर *आपला विद्यार्थी आपल्याच जिल्ह्यातील इतर तालुक्यात असलेल्या शाळेत  डुप्लिकेट झाला आहे असे दिसून आल्यास आपली request ही आपल्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी यांच्या लॉगिन ला जाईल.*तेंव्हा आपण अशा वेळी संबंधित विद्यार्थ्याच्या बाबतीतील पुरावे घेऊन आपल्या शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा व आपली request त्यांच्याकडून approve करून घ्यावी.

✏ तसेच *जर आपला विद्यार्थी आपल्याच विभागातील इतर जिल्ह्यातील कोणत्याही शाळेत  डुप्लिकेट झाला आहे असे दिसून आल्यास आपली request ही आपल्या विभागातील उपसंचालक यांच्या लॉगिन ला जाईल.*तेंव्हा आपण अशा वेळी संबंधित विद्यार्थ्याच्या बाबतीतील पुरावे घेऊन आपल्या विभागाच्या उपसंचालक यांच्याशी संपर्क साधावा व आपली request त्यांच्याकडून approve करून घ्यावी.

✏ आपल्या शाळेतील विद्यार्थी आपल्या शाळेव्यतिरिक्त इतर कोणत्या शाळेत नोंदवला गेला आहे हे समजून घेण्यासाठी *या पोस्ट च्या खाली दिलेल्या लिंक ला क्लीक करून दिलेल्या मॅन्युअल वाचून सविस्तर माहिती जाणून घ्या.*

✏ जर आपल्या शाळेतील एखादा विद्यार्थी इतर शाळेत शिकायला गेलेला असेल परंतु नवीन शाळेने त्या विद्यार्थ्यास ट्रान्सफर करून न घेता new entry द्वारे नवीन विद्यार्थी म्हणून नोंद घेतली असेल तर अशा विद्यार्थ्याच्या बाबतीत जुन्या शाळेने आपल्या शाळेत शिकत नसलेल्या अशा विद्यार्थ्याच्या नावासमोर असलेल्या No या बटनावर क्लीक करावे.अशा वेळी *आपण No या बटनाला ला क्लीक केल्यावर सदर विद्यार्थी ज्या नवीन शाळेत शिकत असेल त्या शाळेला सिस्टिम द्वारे approve केला जाईल.अशा केस मध्ये अशा विद्यार्थ्याच्या बाबतीत नवीन शाळेला सदर विद्यार्थ्यासाठी वरिष्ठ लॉगिन ला संपर्क साधण्याची आवश्यकता असणार नाही याची नोंद घ्यावी.असा विद्यार्थी जुन्या शाळेने No या बटनावर क्लीक केल्यानंतर लगेचच नव्या शाळेस सिस्टिम द्वारे approve केला जाईल.*

➡ जुन्या शाळेने विद्यार्थ्याच्या नावासमोर असलेल्या No टॅब ला क्लीक करण्याआधीच जर नवीन शाळेने अशा विद्यार्थ्याच्या बाबतीत वरिष्ठ लॉगिन ला approve साठी request पाठवलेली असेल आणि वरिष्ठ लॉगिन ने सदर विद्यार्थी तोपर्यंत approve केलेला नसेल तर *जेंव्हा जुनी शाळा त्या विद्यार्थास No म्हणून क्लीक करेल तेंव्हा सदर विद्यार्थ्याची request वरिष्ठ लॉगिन मधून आपोआप निघून जाईल व तो विद्यार्थी नवीन शाळेला सिस्टिम द्वारे approve केला जाईल हे लक्षात घ्यावे.*

➡ तसेच नवीन शाळेने एखाद्या विद्यार्थास approve करण्यासाठी वरिष्ठ लॉगिन ला request पाठवली आणि जर वरिष्ठ लॉगिन ने खात्री करून जर त्या विद्यार्थ्यास approve केले तर सदर विद्यार्थी नोंद नवीन शाळेत ठेवली जाईल व जुन्या शाळेतून ती नोंद सिस्टिम द्वारे परस्पर काढून टाकली जाईल.हे करत असताना *वरिष्ठ लॉगिनने म्हणजेच गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, उपसंचालक यांनी विद्यार्थ्यास approve/reject करताना योग्य कागदपत्रे तपासून खात्री करून घ्यावी जेणेकरून विद्यार्थी नोंद योग्य शाळेत राहील.*

*अशा प्रकारे प्रत्येक शाळेने आपल्या शाळेतील कोणतेही विद्यार्थी डुप्लिकेट झालेले आहे किंवा नाही हे सर्वप्रथम तपासून घ्यावे यासाठी आपण आपल्या शाळेच्या लॉगिन मधील Maintenance या टॅब मधील Duplicate या Tab ला क्लीक करावे.*

✏ लवकरच student पोर्टल मध्ये *विद्यार्थी माहिती भरण्यासाठीचा सेकंड फेज,सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन (CCE),Online निकाल व गुंपत्रक निर्मिती प्रक्रिया* सुरु होणार आहे.त्यापूर्वी प्रत्येक शाळेने सदर काम त्वरित पूर्ण करावयाचे आहे हे लक्षात घ्यावे.अन्यथा अशा डुप्लिकेट विद्यार्थ्याची माहिती आपणास भरता येणार नाही.याशिवाय पुढील वर्षाच्या संच मान्यतेस अडचण निर्माण होईल ही बाब गाम्भीर्याने लक्षात घ्यावी.तसेच *जोपर्यंत असे डुप्लिकेट विद्यार्थी आपल्या शाळा लॉगिन मधून काढले अथवा घेतले जाणार नाही तोपर्यंत त्या त्या शाळेला वरील काम करण्याची सुविधा दिली जाणार नाही अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.*

✏ *या कामाचा लोड सिस्टिम वर येऊ नये म्हणून सदर कामाचे विभाग निहाय वेळापत्रक तयार करण्यात आलेले आहे.त्या नुसार त्या त्या विभागातील जिल्ह्याने आपले हे काम वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे.या वेळापत्रकानुसार दिनांक १ एप्रिल २०१७ पासून ते ५ एप्रिल २०१७ पर्यंत पुणे विभागासाठी (जिल्हे : पुणे, सोलापूर, अहमदनगर) ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.या मुदतीनंतर पुणे विभाग बंद करून दुसऱ्या विभागाला ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.*

*तसेच वेळेवेळी सरल संदर्भात नव्याने येणारी माहिती आपणास आपल्या ब्लॉग ईमेल रीडिंग लिस्ट मध्ये हवी असल्यास आमच्या ब्लॉग  च्या उजव्या-खालच्या बाजूला उपलब्ध असलेल्या follow या बटनाला क्लीक करा व आपल्या ईमेल id च्या साहाय्याने follow करा.त्यानंतर सरल संदर्भात असणारी नविन माहिती सविस्तरपणे त्या त्या वेळी आपणास पाठवली जाईल.*

*राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य व्हायचे असेल तर पुढील लिंक वर क्लीक करा आणि उपलब्ध करून देण्यात आलेला फॉर्म भरा.*

                               *लिंक*

                         goo.gl/j9nFGk

*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
Mobile no. :9404683229
(Dont call,only whatsapp message)
Email: egov.saral@gmail.com
Blog: pradeepbhosale.blogspot.in